रत्नागिरी : रत्नागिरीत माळनाका येथील मराठा मैदानावर १८ आणि १९ जानेवारीला झालेले अखिल मराठा महासंमेलन यशस्वीपणे संपन्न झाले. या महासंमेलनाला भाजपाचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण तसेच सुहासी रविंद्र चव्हाण यांनी भरीव मदतीसह पाठिंबा दिला होता.
५७ क्षत्रिय मराठा मंडळे व संस्थांच्या फेडरेशनने हे तिसरे महासंमेलन आयोजित केले होते. याआधी दोन महासंमेलने यशस्वीपणे पार पडली होती, आणि रत्नागिरीतील हे महासंमेलनही त्या परंपरेला साजेसा दिमाख घेऊन संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी गेल्या महिन्यात मराठा मंडळाचे पदाधिकारी आमदार रविंद्र चव्हाण यांची भेट घेतली होती आणि मदतीचे आश्वासन मिळवले होते. दिलेले आश्वासन पूर्ण करत चव्हाण यांच्यावतीने त्यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांनी मदत सुपुर्द केली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठा फेडरेशनचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, मंडल अध्यक्ष विवेक सुर्वे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संकेत कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाला उपस्थित जनसमुदाय व मराठा समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महासंमेलनाच्या आयोजनातून मराठा समाजाच्या एकात्मतेचे दर्शन घडले असून, समाजाच्या प्रगतीसाठी यापुढेही अशीच एकजूट ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.