राजापूर:- राजापूर तालुक्यातील गोठणे दोनिवडे ग्रामपंचायतीच्या हातणकरवाडी ह्या महसुल विभागातील विविध विकास कामांचे निवेदन राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदार संघांचे नवनिर्वाचित आमदार श्री. किरण सामंत यांना रविवार दि.५ जाने. २०२५ रोजी दादर मुंबई येथे देण्यात आले.
हातणकरवाडीमध्ये २५ वर्षापुर्वी केलेला पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील मुंख्य रस्ता तसेच दत्तमंदिर ते हनुमान मंदिर रस्ता व चौगुले घर ते जडयारपर्यंतच्या रस्त्यांना खुडयेमुक्त करण्यासाठी त्याचे तातडीने सोलिंग केले जावे व वाडीतील ट्रान्सफार्मरच्या मागणीसाठी जलदगतीने आमदारांचे शिफारसपत्र मिळावे अशा मुंख्य मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
तसेच हातणकरवाडीतील मुंख्य रस्ता ते स्मशानभूमी रस्ता,स्मशान येथे बोअरवेल,हातणकरवाडी शाळा ते आकेरा रस्ता,जॉकवेल,हातणकरवाडी ते नेरकेवाडी जोड रस्ता,हातणकरवाडी ते शिळ वरचीवाडी जोड रस्ता,सोपा ते होळीचा मांड जोड रस्ता,मोडबांध येथील धरणाचे पाणी हातणकरवाडीला मिळावे,कोलेधर येथे पाझर तलाव तर कडयाला पर्यटण क्षेत्राचा दर्जा मिळावा अशा महत्वाच्या मागण्यांचे निवेदन मंडळाच्या वतीने आमदारांना देण्यात आले आहे.
निवेदन देतावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री.शांताराम हातणकर,कार्याध्यक्ष श्री.प्रकाश दळवी,उपाध्यक्ष श्री.पांडूरंग हातणकर,श्री.दिनकर दळवी,श्री.सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार,खजिनदार श्री.दिलीप दळवी,सहसेक्रेटरी श्री.प्रकाश लोळगे,युवा सेक्रेटरी कु.रोशन दळवी,श्री.संदिप मटकर,श्री.विलास लोळगे,श्री.सुधाकर माळी,श्री.काशिराम दळवी असे मंडळाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.