रत्नागिरी:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी आणि भाजपचे संकटामोचक आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर पुन्हा एकदा राज्याची जबाबदारी येऊन पडली आहे.
मागच्या काळात गृहमंत्री अमित शहा यांनी रवींद्र चव्हाण याच्या वर सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी सोपवली होती. आत्ता तात्काळ आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या संघटन पर्व प्रदेश प्रभारी निवड झाली असून याबाबतचे पत्र प्रदेशाध्यक्ष, मंत्री चंदशेखर बावनकुळे यांनी दिले.
सध्या प्रभारी म्हणून हे पद आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे देण्यात आले असून 12 जानेवारीला केंद्रीय बोर्डाकडून नियुक्ती केली जाणार असल्याचे समजते.