शिवसेना (उद्धव ठाकरे) विभागप्रमुखासह कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश.

0
37

रत्नागिरी:- वाटद जि. प. गटातील कासारी गावातील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी आणि माजी पं. स. सभापती सौ. संजना माने, उबाठा शिवसेना पक्षाचे वाटद विभागप्रमुख उदय माने आणि कार्यकर्त्यानी भाजपामध्ये प्रवेश केला. माजी मंत्री, आमदार रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांना भाजपचा झेंडा देऊन स्वागत केले. मंडल अध्यक्ष विवेक सुर्वे, उमेश देसाई, प्रतिक देसाई व जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या नेतृत्वात हा प्रवेश नुकताच झाला.

कित्ते भंडारी सभागृहात आयोजित कार्यक्रमावेळी माजी पं. स. सभापती सौ. संजना माने यांच्यासमवेत कविता माने, आरती माने, आराध्या माने, अनंत माने, सुधाकर शितप, योगेश माने, समीर रहाटे, अरविंद माने, शुभम माने, अनिकेत माने, उद्योजक सुरेश माने, संकेत माने यांनी भाजपात प्रवेश केला. वाटद गावातील जवळपास ४५० जणांनी भाजपात प्रवेश केला आहे, अशी माहिती उदय माने यांनी दिली. या प्रवेशामुळे भाजपाची ताकद आणखी वाढणार आहे. वाटद गटामध्ये भाजपाला याचा फायदा आगामी निवडणुकीत होणार आहे.

या वेळी भाजपाचे दक्षिण रत्नागिरी सरचिटणीस सतेज नलावडे, उत्तर जिल्हाध्यक्ष केदार साठे, डॉ. विनय नातू, प्रमोद जठार, महिला प्रदेश सरचिटणीस शिल्पा मराठे, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, महिला शहराध्यक्ष पल्लवी पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, ऋषिकेश केळकर, ॲड. बाबासाहेब परुळेकर, ॲड. विलास पाटणे, सचिन वहाळकर यांच्यासमवेत मंडल अध्यक्ष, विधानसभा प्रमुख, तालुकाध्यक्ष, मोर्चा, प्रकोष्ठप्रमुख, शहराध्यक्ष उपस्थित होते.

रानपाट ग्रामस्थ भाजपामध्ये
मयुर गोनभरे यांच्या नेतृत्वात पूर्ण रानपाट गावाने भाजपाला पाठिंबा देत, सर्वांनी भाजपात प्रवेश केला आहे. या प्रवेशाकरिता मंडल अध्यक्ष विवेक सुर्वे, उमेश देसाई, प्रतिक देसाई यांनी मेहनत घेतली. रानपाट ग्रामस्थांचे भाजपात स्वागत करण्यात आले. आमदार रविंद्र चव्हाण यांनी भाजपाचा झेंडा देऊन या सर्वांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here