राजापूर:- यावेळी रस्ता सुरक्षा व अपघाताचे वाढते प्रमाण, अठरा वर्षाखालील मुलांना गाडी चालवण्यास निर्बंध, ड्रिंक अँड ड्राईव्ह, तसेच विनापरवाना गाडी चालवणे, सीट बेल्टचा वापर न करणे, विना कागदपत्र गाडी चालवणे इत्यादींचे मार्गदर्शन प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी श्री. सुशांत पाटील यांनी प्रशालेतील आर. एस. पी. विद्यार्थ्यांना दिले.
विद्यार्थ्यांनी देखील वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. त्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन बॅरिस्टर नाथ पै संस्थेचे अध्यक्ष व ओणी संस्थेचे कार्यवाह ऍड. गुरदत्त खानविलकर यांनी केले.
यावेळी रत्नागिरी एसटीचे अधिकारी रमेश कोकरे व अरुण लाड, प्रशालेतील आर. एस. पी. विषयाचे जिल्हा समादेशक पुंडलिक वाजंत्री व प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक सुनील कोंडकर, पर्यवेक्षक विनोद मिरगुले, ग्रंथालय कर्मचारी, तसेच प्रशालेतील आर. एस. पी. विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जाधव यांनी केले, आणि आभार वसंत झोरे यांनी मानले.