रत्नागिरी:- कोंकण कोस्टल मॅरेथॉन 10 किलोमीटर स्पर्धेत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र विभाग रत्नागिरीतील स्पर्धा परीक्षा अभ्यासिका/क्लासमध्ये असलेल्या सिमा सुरेश राठोड-मुरुगवडा, रत्नागिरी हिने दुसरा क्रमांक मिळवून मान मिळवला.
सिमाने आपल्या परिश्रमांनी आणि अथक प्रयत्नांनी हे यश मिळवले, ज्यामुळे जिजाऊ संस्थेचे नाव रोशन झाले. जिजाऊ संस्थेच्या वतीने सिमाचे हार्दिक अभिनंदन करत तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गेल्या.