रत्नागिरी:- आज दिनांक २ ऑक्टोंबर रोजी गांधी जयंती (Gandhi Jayanti) निमित्त संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या (Bharatiya Janata Party) वतीने प्रत्येक मंडलामध्ये महापुरुषांचे पुतळे असलेला परिसर या ठिकाणी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या नेतृत्वात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

रत्नागिरी शहरामध्ये शहराध्यक्ष राजन फाळके यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने मारुती मंदिर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येथील परिसर, माळ नाका येथील ओबीसी नेते शामराव पेजे यांचा पुतळा असलेला परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असलेला परिसर, तसेच लक्ष्मी चौकातील विनायक दामोदर सावरकर यांचा पुतळा असलेला परिसर भाजपा कार्यकर्त्यांनी स्वच्छ केला.

या स्वच्छता मोहीमा यशस्वी करण्यासाठी पक्षाने ओबीसी जिल्हाध्यक्ष कृष्णकांत उर्फ भाई जठार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हाभरात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. शहराध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरामध्ये राबविण्यात आलेली स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी भाजप पदाधिकारी यांनी मेहनत घेतली. यावेळी शहराध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह प्रशांत डिंगणकर, मंदार मयेकर ,सुप्रिया रसाळ, संदीप रसाळ ,सायली बेर्डे, प्राजक्ता रूमडे, तुषार देसाई, भाई जठार, रमाकांत आयरे ,मंदार भोळे ,पल्लवी पाटील आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


