पत्रकार संतोष पोटफोडे यांनी घेतली वैद्यकीय अधिकारी रुपाली माने यांची भेट
साखरपा:- चीन मध्ये सध्या मेटा निमोव्हायरस (एच एम पी व्ही ) या विषारी विषाणूचा उद्रेक झाला असून कोरोनासारखी परिस्थिती ओढवू नये यासाठी प्रत्येक ठिकाणची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे जनतेने घाबरू नये व अफवांवर विश्वास ठेऊ नये त्याचबरोबर जनतेने निष्काळजीपणा देखील करू नये असे आवाहन साखरपा आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी रुपाली माने यांनी केले आहे. अशा प्रकारचा पहिला रुग्ण नेदरलँड मध्ये आढळला होता
याबाबतीत पत्रकार संतोष पोटफोडे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन योजन्यात येणाऱ्या उपाय योजनाची माहिती घेतली साखरपा आरोग्य केंद्र हे दहा ग्रामपंचायतीच्या अख्त्यारीत असून एकोणीस गावे जोडली आहे तर चार उपकेंद्र आहेत या सर्वांच्या माध्यमातून गावोगावी जनजागृती करण्यात येणार आहे यासाठी केंद्रातील सर्व कर्मचारी व त्याचबरोबर अंगणवाडी सेविका आशाताई् यांचे सहकार्य घेणार असल्याचे सांगण्यात आले
कोरोनासारखी परिस्थिती उद्भवू नये यासाठी आधीच काळजी घेतली जाणार आहे.
खोकला शिंका आल्यास तोंड नाक टिशू पेपरने अथवा रुमालाने झाकणे, साबण आणि पाणी किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ धुणे ताप खोकला किंवा शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहणे पाणी भरपूर पिणे व योग्य आहार याने संक्रमण कमी होईल याची दक्षता घ्या
पुढील गोष्टी टाळा
टिशू पेपर व रुमालाचा पुन्हा वापर टाळणे,आजारी लोकांशी जवळचा संपर्क तसेच डोळे नाक आणि तोंडास वारंवार स्पर्श करणे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे या सर्व बाबी टाळाव्यात आणि डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय औषधे घेऊ नये अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी प्रत्येक आरोग्य केंद्राना दिली आहे