पावस:- जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र ( संस्थापक – श्री निलेश सांबरे ) यांच्या माध्यामातून पावस विद्यामंदिर हायस्कूल ( ता. रत्नागिरी. जि. रत्नागिरी) मध्ये शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षांसाठी (NMMS, Scholarship) दिनांक १४ ॲाक्टोबर २०२४ ते १८ ॲाक्टोबर २०२४ पर्यंत सकाळी ११ ते १ या वेळेत गणित व बुध्दिमत्ता या विषयांसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे या मार्गदर्शनासाठी स्पर्धा परीक्षांन वरील पुस्तकांचे लेखक श्री खेमचंद्र पाटील यांना खास पुणे येथुन जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आमंत्रित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी श्री केदार चव्हाण यांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले आहे .
