ठाणे, १ मार्च २०२५ – जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र (ठाणे शहर विभाग) आयोजित “जिजाऊ महोत्सव २०२५” अंतर्गत संस्थेचे संस्थापक श्री. निलेश भगवान सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील रुग्णांसाठी औषधासहित मोफत शस्त्रक्रिया व उपचार दिले जाणार आहेत.
हा उपक्रम १ मार्च ते १७ एप्रिल २०२५ या कालावधीत श्री. भगवान महादेव सांबरे क्रिस्टल केअर रुग्णालय, शहापूर (आसनगाव) व श्री. भगवान महादेव सांबरे रुग्णालय, झडपोली, विक्रमगड, पालघर येथे राबविण्यात येणार आहे.
उपक्रमाचे वैशिष्ट्ये:
✅ मोफत औषधोपचार व शस्त्रक्रिया
✅ तज्ञ डॉक्टरांकडून उपचार सेवा
✅ समाजातील गरजू रुग्णांसाठी संजीवनी
“स्वप्न तुमचे, ध्यास आमचा! प्रयत्न तुमचे, आधार जिजाऊंचा!” या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम अनेक रुग्णांसाठी आशेचा किरण ठरणार आहे.
रुग्णालये व संपर्क:
📍 श्री. भगवान महादेव सांबरे क्रिस्टल केअर रुग्णालय (मोफत रुग्णालय), नीरा आर्केड, हॉटेल अतिथीच्या बाजूला, मुंबई-नाशिक हायवे, शहापूर (आसनगाव)
📍 श्री. भगवान महादेव सांबरे रुग्णालय, झडपोली, पोस्ट – ओंदे, तालुका – विक्रमगड, जिल्हा – पालघर
🔹 अधिक माहितीसाठी संपर्क:
📞 श्री. परेश कारंडे – 090299 77770 / 07777071761
📞 श्री. जतीन देठे – 7715891367
या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी गरजू रुग्णांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी तत्काळ संपर्क साधावा.