जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि महाराष्ट्र श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालय, झडपोली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य व नेत्र तपासणी शिबिर आज, दि. १८ मार्च २०२५ रोजी ग्रामपंचायत कासारवेली, रत्नागिरी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या शिबिरास ग्रामस्थ आणि रुग्णांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
शिबिरादरम्यान सन्माननीय निलेश भगवान सांबरे साहेबांच्या माध्यमातून सर्व रुग्णांना मोफत चष्मे वाटप, हृदयरोग तपासणीसाठी ईसीजी, डोळ्यांची तपासणी तसेच मोफत औषध वाटप करण्यात आले. याशिवाय, रुग्णांसाठी मुळव्याध, अपेंडिक्स, किडनी स्टोन, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी यांसारखी महत्त्वाची शस्त्रक्रिया तसेच स्त्रीरोगविषयक सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स पूर्णतः मोफत करण्यात येणार आहेत.
या उपक्रमामुळे कासारवेली व परिसरातील गरजू रुग्णांना संजीवनी मिळाली असून, त्यांनी जिजाऊ संस्थेचे संस्थापक श्री. निलेश भगवान सांबरे यांचे मनःपूर्वक आभार मानले. समाजाच्या आरोग्य सेवेसाठी राबविल्या जाणाऱ्या या महान उपक्रमाबद्दल स्थानिक ग्रामस्थ आणि लाभार्थ्यांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले. यावेळी जिजाऊ संस्थेचे जिल्हाध्यक्ष अॅड. महेंद्र मांडवकर, तालुकाध्यक्ष श्री. मंदार नैकर, सरपंच, उपससरपंच, जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, गावातील प्रमुख व्यक्ति, मेडिकल टीम, आदि उपस्थित होते.
