रत्नागिरी:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी यांच्या प्रशासकीय, तांत्रिक व आर्थिक सहकार्याने तसेच डॉ. नानासाहेब मयेकर फाउंडेशन मालगुंड यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट (14 व 17 वर्षाखालील मुले व मुली) स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
स्पर्धेचे ठिकाण आणि तारीख:
14 वर्षांखालील मुले आणि मुलींसाठी स्पर्धा 4 फेब्रुवारी 2025 रोजी आणि 17 वर्षांखालील मुले आणि मुलींसाठी 5 फेब्रुवारी 2025 रोजी कै. डॉ. नानासाहेब मयेकर क्रीडांगण, मालगुंड येथे होणार आहे.
आवश्यक माहिती:
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, खेळाडूंनी विहित नमुन्यातील स्पर्धा प्रवेशिका, खेळाडू ओळखपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रांसह स्पर्धा ठिकाणी उपस्थित राहावे.
संपर्क:
स्पर्धेच्या अधिक माहितीकरिता टेनिस क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव सिद्धेश गुरव (8779669496) तसेच क्रीडांगणाचा पत्ता जाणण्यासाठी रुपेश तावडे (9403506737) यांच्याशी संपर्क साधावा.
नोट:
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई द्वारा नव्याने मान्यता दिलेल्या खेळांच्या क्रीडा स्पर्धांना शासकीय योजनांचे लाभ जसे की 5% खेळाडू आरक्षण, क्रीडा गुण सवलत, शिष्यवृत्ती, रोग पारितोषिके इ. उपलब्ध होणार नाहीत. याची नोंद सर्व खेळाडू, क्रीडाशिक्षक आणि पालकांनी घ्यावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी सांगितले.