भडे | 26 जानेवारी – जि. प. आदर्श शाळा भडे नं १ मध्ये नुकत्याच पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात या वर्षीचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार जाहीर करण्यात आला. भडे गावचे माजी सरपंच कै. ग. म. तेंडुलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार त्यांचे चिरंजीव प्रविणशेठ तेंडुलकर आणि परिवाराकडून देण्यात आला.
या वर्षीचा पुरस्कार कु. तिर्था राजेंद्र लिंगायत व कु. मानसी संदीप तोस्कर यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप चषक, सन्मानपत्र आणि रोख ₹1001 असे होते.
या प्रसंगी विजयकुमार शेठ, प्रविण तेंडुलकर, लाखण (माजी केंद्र प्रमुख), कुड (मुख्याध्यापक), सरपंच बंडबे, खुटाळे, दळी, माने, आडविलकर, संजीवकुमार राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.