झरेवाडी:- जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा झरेवाडी येथे ‘शिक्षण व जीवन कौशल्य’ या विषयावर प्राध्यापक डॉ. राहुल मराठे यांचे व्याख्यान नुकतेच संपन्न झाले. विद्यार्थ्यांना प्रेरणा देणाऱ्या या कार्यक्रमात डॉ. मराठे यांनी गोष्टीरूपात, चित्रांच्या माध्यमातून आणि अनेक उदाहरणे देत विषय सुलभ व आकर्षक पद्धतीने सादर केला. त्यांच्या ओघवत्या शैलीमुळे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट वक्तृत्वाचा अनुभव मिळाला.

कार्यक्रमाला गणपतीपुळे बीटच्या विस्ताराधिकारी सौ. तोटावार मॅडम, केंद्रप्रमुख विष्णू पवार सर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ओंकार आचरेकर सर, शिक्षणप्रेमी प्रकाश गोताड सर, तसेच सरिता अलीम मॅडम, अपूर्वा काळोखे मॅडम आणि रामनाथ बने सर हे शाळेतील अध्यापक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक राजेश गोसावी सर यांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना जीवनात उपयोगी कौशल्यांची दिशा मिळाली असून, उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.

संपादक – हृषिकेश विश्वनाथ सावंत