लांजा:- सह्याद्री फाउंडेशन, जळगावतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श युवा गौरव पुरस्कार यंदा भडे गावचे पोलीस पाटील श्री. प्रशांत प्रभाकर बोरकर यांना जाहीर झाला आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय असून, त्यांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्तम निवेदक म्हणून काम पाहिले आहे.
सह्याद्री फाउंडेशन जळगाव दरवर्षी समाजासाठी निस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या युवकांना गौरवित करते. श्री. प्रशांत बोरकर यांच्या कार्याचा सन्मान म्हणून हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर श्री. बोरकर यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीय, मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांना दिले असून, “हा पुरस्कार माझ्यासोबतच सर्वांचाच आहे,” असे नम्र उद्गार काढले.