⛔ *टाइम्स विश्वनाथ न्यूज*
🔷 *तेली समाज भवन साठी स्वखर्चाने दिली तीन गुंठे जमीन!*
*रत्नागिरी :-* समस्त तेली समाजाचे आपले हक्काचे समाज भवन असावे अशी इच्छा होती, ही इच्छा तेली बांधवानी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्याकडे बोलून दाखवली, अनेक गरज वंतांना आपला आधार वाटणारे रवींद्र चव्हाण साहेबांनी या समाज बांधवांची विनन्ती तात्काळ मान्य केली. परंतु चव्हाण यांनी कोणताही शासकीय भूखंड उपलब्ध न करता , स्वखर्चाने खाजगी जागा खरेदी करण्यासाठी 40 लाख रुपये एवढी मोठी रक्कम दिली.
त्यामुळे आज तेली भवन साठी रत्नागिरी गायाळवाडी येथे 3 गुंठे जागा खरेदी करण्यात आली. मंत्री रवींद्र चव्हाण यांचे कोकणावर विशेष प्रेम असून त्यांचे दातृत्व अनमोल आहे,त्यांनी श्री संताजी जगनाडे महाराज सेवा संस्था रत्नागिरी यांच्या तेली भवन साठी 40 लाख रुपये रोख दिल्यामुळे आज आम्ही तेली भवन उभारण्यासाठी स्वतःची 3 गुंठे जागा खरेदी करू शकलो.
ना.रवींद्र चव्हाण राज्याचे कॅबिनेट मंत्री असून त्यांनी सहज कोणताही शासकीय भूखंड देऊ केला असता परंतु त्यांनी तसे न करता स्व खर्चाने आम्हाला जागा खरेदी करण्यास मोठी आर्थिक मदत केली. चव्हाण साहेब व भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी संपूर्ण तेली समाज अखंड पणे राहील असे यावेळी बावाशेठ नाचणकर, किशोर पावसकर, शरद कोतवडेकर, प्रभाकर खानविलकर आदिनी सांगितले.
*टाइम्स विश्वनाथ न्यूज ला फॉलो करा!*
*WhatsApp:-* https://chat.whatsapp.com/GZ6IQSvT5NI6kTkavd1MV1
मंत्री रवींद्र चव्हाणांचे कोकणावर विशेष प्रेम!
