राजापूर:- माजी आमदार राजन साळवी यांना राजापूर तालुक्यात स्थानिक नेते, आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती पदाधिकाऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांमुळे कोकणातील राजकीय वातावरण तापले आहे. विकासाच्या मुद्द्यावर साळवी यांचे नेतृत्व लोकांना विश्वासार्ह वाटत असून, विरोधकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.