रत्नागिरी:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘ममता दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. हा विशेष कार्यक्रम शिवसेना सचिव आणि मा. खासदार विनायकजी राऊत यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमात माँसाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाला उपजिल्हा प्रमुख शेखर घोसाळे, तालुका प्रमुख बंड्याशेठ साळवी, उपतालुका प्रमुख विजय देसाई, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, शहर संघटक प्रसाद सावंत, उपशहर प्रमुख नितिन तळेकर, विभाग प्रमुख मयूरेश्वर पाटील, सलिल डाफळे, अमित खडसोडे, शकील महालदार, धनंजय नलावडे, प्रशांत सुर्वे, उपविभाग प्रमुख प्रविण सुर्वे, दिलावर गोदड आदी मान्यवर उपस्थित होते.
महिला कार्यकर्त्यांमध्ये माजी नगरसेविका रशीदा गोदड, उपशहरप्रमुख विजया मामी घुडे, उन्नती कोळेकर, सेजल बोराटे, माजी नगरसेविका राजश्री शिवलकर, पूजा जाधव, सुवर्णा कडू, स्मिता काटकर शिरधनकर, हिना दळवी, रमीजा तांडेल आणि रिहाना यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
‘ममता दिन’ हा कार्यक्रम माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या कार्याचा आदर आणि शिवसैनिकांच्या एकतेचे प्रतीक ठरला.