पाणीपुरवठा होणार सुरळीत.
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील सहकार नगर नाचणे रोड प्रभाग क्रमांक ६ मध्ये असलेली पाण्याची टाकी गेल्या अनेक महिन्यांपासून गळती लागली होती. या टाकीच्या दुरुस्तीचे काम आठ महिन्यांपूर्वी मंजूर झाले होते, पण काही कारणांमुळे ते लांबणीवर गेले होते. स्थानिकांच्या मागणीनुसार भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी नगर परिषदेला याबाबत पत्र दिले होते. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता आणि टाकीवर चढून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यावर नगर परिषद मुख्याधिकारी बाबर यांनी पुढील आठ दिवसांत दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले, त्यानंतर भाजपाने आंदोलन थांबवले.
आता या टाकीच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे आणि सध्या प्रभागातील भागांना थेट मुख्य लाईनवरून पाणीपुरवठा सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे पदाधिकारी शैलेश बेर्डे यांनी प्रत्यक्ष जाऊन टाकीच्या कामाची पाहणी केली. याबद्दल स्थानिक रहिवाशांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.