रत्नागिरी:– स्किन अँड हेअर ट्रीटमेंट तसेच मेकअप यासंदर्भात रत्नागिरीमध्ये वन डे ग्रँड सेमिनार मोठ्या उत्साहात पार पडला. या विशेष सेमिनारमध्ये इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट अलका गोविंद आणि सुप्रिया दास यांनी उपस्थित ब्युटीशियन्सना व्यावसायिक मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिकांद्वारे शिक्षण दिले.
उर्वी ब्युटी पार्लर, मेकअप एक्सपर्ट & स्टुडिओ यांच्या वतीने उर्वी गोवळकर यांनी या सेमिनारचे आयोजन केले होते. तसेच ब्युटी सलोन अँड स्पा असोसिएशन, रत्नागिरी यांनी या उपक्रमाला सहकार्य केले.
या कार्यक्रमाला सौ. ऐश्वर्या जठार, काजल जठार तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक ब्युटीशियन्स मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. व्यावसायिक ज्ञान आणि कौशल्य वृद्धी करणाऱ्या या सेमिनारला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.