राजापूर, रत्नागिरी, दि. २४ जानेवारी २०२५
वारकरी सांप्रदाय प्रसारक मंडळ, मौजे शीळ (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) यांच्या वतीने आणि सद्गुरु ह. भ. प. विश्वनाथ (भाई) गोसावी यांच्या कृपेने अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम जि. प. शाळा शीळ क्र. १ च्या मागील पटांगणावर शुक्रवार, दि. २४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता सुरू होणार असून, रात्रौ ९.०० वाजेपर्यंत चालणार आहे.
कार्यक्रमाचा तपशील:
- सकाळी ८.०० वाजता: श्रींचे पूजन, आरती व हरिपाठ
- सकाळी १०.३० ते ११.३०: स्थानिक वारकऱ्यांचे भजन
- सकाळी ११.३० ते १.००: ह. भ. प. गुरूवर्य भाई महाराज गोसावी (सोल्ये) यांचे प्रवचन
- दुपारी १.०० ते २.००: महाप्रसाद
- दुपारी २.०० ते ३.००: गिरीष विचारे यांचे सुस्वर गायन
- दुपारी ३.०० ते ४.३०: स्थानिक भजने आणि महिलांचे विशेष कार्यक्रम
- सायंकाळी ५.०० ते ६.३०: ह.भ.प. सोनू बाबा कुर्णेकर (भांबेड पंचक्रोशी) यांचा हरिपाठ
- सायंकाळी ६.३० ते रात्रौ ८.००: ह. भ. प. राजेश राजशिर्के महाराज (सावर्डे, चिपळूण) यांचे हरिकीर्तन
कार्यक्रमासाठी वारकरी सांप्रदाय व ग्रामस्थ शिळ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या अध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. रविंद्र म. नागरेकर, अध्यक्ष, राजापूर तालुका वारकरी संप्रदाय यांनी केले आहे.