राष्ट्रीय शाळेय तायक्वॉन्डो क्रीडा स्पर्धत गणराज क्लबची सुरभी व गौरी विदिशा मध्यप्रदेश येथे रवाना.

0
50

रत्नागिरी:- राष्ट्रीय शाळेय तायक्वॉडो क्रीडा स्पर्धचे आयोजन विदीशा मध्यप्रदेश येथे दिनांक ८ नोंव्हेबर ते १२ नोंव्हेबर २०२४ रोजी या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धकरीता गणराज क्लबच्या गौरी सारीका अभिजित विलणकर ही इयत्ता 9 वी SVM शाळे मध्ये शिकत आहे.व सुरभी तेजस्वी राजेद्र पाटील ही इयत्ता 5 वी मध्ये पोतदार शाळे मध्ये शिकत आहे. गौरी ची ही ६ वी राष्ट्रीय स्पर्धा आहे, तर सुरभीची ही ४ थी राष्ट्रीय स्पर्धा आहे.गौरी व सुरभीला मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक आंतर राष्ट्रीय खेळाडू, एशियन युनियन कोच, राष्ट्रीय पंच , महाराष्ट्र राज्य स्वयंमसिध्दा प्रशिक्षक श्री.प्रशांत मनोज मकवाना व महिला प्रमुख प्रशिक्षक सौ.आराध्या प्रशांत मकवाना यांचे मार्गदर्शन लाभत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गणराज क्लबने नेहमीच राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.

गौरी व सुरभीला पुढील वाटचालीसाठी शाळेच्या मुख्याध्यापक सौ. मोनिका जैसवाल,(SVM) श्री. राकेश चव्हाण (PODAR), सौ.राधा करमरकर, श्री नविन सांवत, सौ. सपना साप्ते, रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विजय शिदें यांनी सुरभी व गौरीला शुभेच्छा दिल्या, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष वेंकटेश कररा, उपाध्यक्ष निरज बोरसे, दुलीचंद मेश्राम, प्रवीण बोरसे, सहसचिव सुभाष पाटील, कार्यकारणी सदस्य अजित घार्गे, सतीश खेमस्कर ,जिल्हा सघंटनेचे सचिव लक्ष्मण के, खजिनदार शंशाक घडशी, तसेच गणराज क्लब चे पदाधिकारी अभिजित विलणकर, नुतन किर, रंजना मोडूंळा, साक्षी मयेकर, कनिप्का शेरे, यशंवत शेलार, पुजा कवितके, एस.आर.के चे प्रशिक्षक शाहरुख शेख, जयभैरीचे प्रशिक्षक मिलिंद भागवत पालकवर्ग आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here