रत्नागिरी:- रेयांश बने याची सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तो महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणारा सर्वात लहान खेळाडू आहे. रेयांशने 12 व्या महाराष्ट्र राज्य रोलर स्केटिंग निवड चाचणी स्पर्धेत दोन सुवर्ण पदके मिळवली. तो युरो स्कूल, ठाणे येथे दुसरीत शिकत असून त्याने वयाच्या तिसऱ्या वर्षापासून स्केटिंगचा सराव सुरू केला. रेयांशने 96 तास सतत स्केटिंग करून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. त्याने विविध स्पर्धांमध्ये 24 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्य पदके मिळवली आहेत.