लांजा – लांजा तालुका प्रवासी संघटनेची सभा पार पडली, ज्यामध्ये एसटी महामंडळाने केलेल्या प्रवासी भाडेवाढीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी तालुक्यातील नागरिकांना एसटी प्रवासात भेडसावणाऱ्या गैरसोयी आणि असुविधांवर सविस्तर चर्चा झाली.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एसटी सेवा सुधारण्याची मागणी करत भाडेवाढ त्वरित मागे घेण्याचे आवाहन केले. या संदर्भात माननीय परिवहन मंत्री यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले असून, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.