लांजा (जि. रत्नागिरी) – लांजा तालुक्यातील महिलांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र (लांजा केंद्र) यांच्या वतीने मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण व मॉर्डन फॅशन क्लासेस आयोजित करण्यात आले आहेत. रत्नागिरी विभागात विशेषरूपाने आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमाला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
प्रशिक्षणामध्ये मिळणाऱ्या सुविधा:
या मोफत प्रशिक्षण कोर्समध्ये महिलांना कपडे शिवण्याचे आणि आधुनिक फॅशन डिझायनिंगचे संपूर्ण मार्गदर्शन दिले जाणार आहे. प्रशिक्षणामध्ये खालील विषय मोफत शिकवले जातील –
🔹 ब्लाऊज, फ्रॉक, ड्रेस, कुर्ती
🔹 पेटीकोट, गाऊन, घागरा-चोळी, नववारी साडी
🔹 लहान मुलांचे कपडे – झबले, लंगोट, अंगरं-टोपरं
🔹 आरी वर्क, कुशन वर्क, मायक्रोनी
🔹 नेलआर्ट आणि नथ मेकिंग
नोंदणी व अधिक माहिती:
या कोर्समध्ये भाग घेण्यासाठी नोंदणी (Registration) करणे आवश्यक आहे. इच्छुक महिलांनी खालील पत्त्यावर येऊन प्रत्यक्ष नोंदणी करावी.
📍 प्रशिक्षण ठिकाण:
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र – बँक ऑफ इंडिया, खरेदी विक्री संघ, लांजा – ४१६७०१
📍 ऑफिस पत्ता:
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र – बँक ऑफ इंडिया, खरेदी विक्री संघ, लांजा, रत्नागिरी – ४१६७०१
📍 Google Map Link: https://maps.app.goo.gl/4aKAopVefwSyW8rz9
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी:
अधिक माहितीसाठी संपर्क:
📞 चैत्राली मॅडम: 8010602833
📞 श्री. योगेश पांचाळ: 89996 63079
📞 श्री. केदार चव्हाण: 72086 12222
महिलांनी या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा आणि नवीन कौशल्य आत्मसात करून रोजगाराच्या संधी वाढवाव्यात, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.