लांजा: जनसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र, श्री निलेश भगवान सांबरे रुग्णालय झडपोली, तसेच लांजा पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
हे शिबिर गुरुवार, 20 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत संकल्प सिद्धी हॉल, पोलीस वसाहत, लांजा येथे पार पडले. या शिबिरात नागरिकांना निःशुल्क आरोग्य तपासणी, नेत्रतपासणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला प्राप्त झाला. तब्बल 382 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डी.वाय.एस.पी. मा. श्री यशवंत केडगे, पोलीस निरीक्षक मा. श्री नीलकंठ बगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती देवकन्या मैदाड, पोलीस उपनिरीक्षक मा. श्री अमोल सरगळे, सहाय्यक पोलीस मा. श्री शिरीष भोसले यांची उपस्थिती लाभली.
तसेच, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष महेंद्र मांडवकर, लांजा तालुका प्रमुख योगेश पांचाळ, जिजाऊ सदस्य महेश देवरुखकर, मुस्लिम वेल्फेअर सोसायटी लांजा अध्यक्ष मा. अखिल नाईक, मा. श्रीमती निकत डिंगणकर, मुस्लिम वेल्फेअर सोसायटी रत्नागिरीच्या वृंदा बोरकर, शरीफ वाडकर, तसेच सामाजिक कार्यकर्ते गुरुप्रसाद देसाई, राजू दादा जाधव, नगरसेवक लहू दादा कांबळे, सनगरे गुरुजी हे देखील कार्यक्रमास उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते व लांजा पोलिस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.