वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्षपदी श्री अनिल मोरे यांची निवड.

0
50

मुंबई:- मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरून कोकण रेल्वे मार्गावर नेहमीसाठी वसई सावंतवाडी पॅसेंजर सुरू करण्यासाठी ह्या प्रवासी संघटनेची स्थापना करण्यात आली. प्रवासी संघटनेची सर्वसाधारण सभा व कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा.मधू दंडवते साहेब यांचा जन्मशताब्दी सोहळा समारोप रविवार दिनांक १९ जाने.२०२५ रोजी सायं.३.३० वा.राजा शिवाजी विद्यालय नालासोपारा या ठिकाणी पार पडला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. अनिल मोरे साहेब यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.प्रवासी संघटना मागील ७ ते ८ वर्षापासून वसई विरारसह,मुंबई लोकल, कोकण रेल्वे व कोकणातील अनेक विधायक कामांसाठी पुढाकार घेऊन पाठपुरावा करीत आहे.

सभेमध्ये प्रा.मधू दंडवते यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना प्रवासी संघटनेच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच त्यांच्या स्मृतीना उजाळा देण्यात आला.

यामध्ये प्रामूख्याने वसई विरार : शेरींग रिक्षाभाडे वाढ,वसई रोड टर्मिनस,नायगाव न्यूचंद्र येथील पश्चिम व मध्य रेल्वेला जोडणारे फाटक,मेट्रो रेल्वे,डहाणू वसई ते पनवेल दरम्याने लोकल सुरू करणे,मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल,मनपाच्या अपुऱ्या बसेस,पाणी टंचाई,लाईटची दुरावस्था,ट्राफीक जाम आणि अरुंद रस्ते या समस्यांनी वसई विरारकर भयंकर त्रासलेले असून त्यासंदर्भात नवनिर्वाचित आमदार श्री.राजन नाईक साहेब,सौ.स्नेहा दुबे / पंडीत व पालघरचे खासदार मा.डॉ.हेमंत सावरा यांना लवकरच निवेदन देण्याचे ठरवण्यात आले.

पश्चिम रेल्वेवरून कोकण रेल्वे मार्गावर सुरू केलेली १o११५/१६ ही वांद्रे मडगाव सुपरफास्ट एक्सप्रेस बंद करून वसई सावंतवाडी पॅसेंजर नेहमीसाठी सुरू करावी अशी प्रमूख मागणी करण्यात आली.कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करून महाराष्ट्रातील भाग मध्य रेल्वेत समाविष्ठ करावा,पनवेल चिपळूण मेमू रेल्वे सुरू करणे,प्रत्येक तालुक्याला जादाचे हॉल्ट मिळावेत,आरक्षण कोटा वाढवावा,नवीन दादर रत्नागिरी इंटरसिटी एक्सप्रेस सुरु करावी,कल्याण सावंतवाडी पॅसेंजर सुरू करणे व रखडलेल्या सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण करून त्याला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा.मधू दंडवते साहेब यांचे नाव देण्यात यावे अशा महत्वाच्या मागण्यांचे निवेदन कोकण रेल्वेचे आयुक्त व रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार मा.श्री.नारायण राणे साहेब यांना देण्याचे ठरवण्यात आले.

मुंबई लोकल मध्ये वाढत्या AC मुंबई लोकलचा विचार करता सर्वसामान्य प्रवाशांना त्यांचे प्रवास भाडे परवडणारे नाही.१२ ते १५ हजारावर काम करणाऱ्या मुंबईकरांनी विरार ते चर्चगेट दरम्यानच्या प्रवासाला पाससाठी महीना २२००/- रू.आणायचे कोठून? त्यासाठी मुंबईच्या तिन्ही मार्गावर सर्वच्या सर्व AC लोकल सुरू करून त्या सेकंटक्लासच्या तिकीटदरामध्ये चालवाव्यात, सेफ्टीडोअरमुळे सामान्य प्रवाशांचा प्रवास तरी सुखकर होईल असा सूर आळवण्यात आला.यासाठी लोकप्रतिनिधींसोबत पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर व DRM यांची पुन्हा एकदा भेट घेण्याचे ठरवण्यात आले.

यावेळी श्री.अनिल मोरे,श्री.जगदिश सावंत,श्री.शेखर बागवे,श्री.यशवंत जडयार,श्री.बाळ वेळकर,सौ.संजना पालव,श्री.सतिश पवार,श्री.सुदेश तावडे,श्री.संदेश लाड,श्री.रंजन पालेकर,श्री.संदेश रामाणे,श्री.बर्नाड डिसोजा,श्री.नंदू जाधव,श्री.भरत परब,श्री.बाबीराम काजरे,श्री.सत्यवान सावंत,श्री.रामचंद्र गावडे,श्री.रामचंद्र सावंत,श्री.नरेंद्र मोरे,श्री.सुभाष गावडे,श्री.सुरेश राणे,श्री.बाळकृष्ण ठुकरूल,श्री.रूपेश घवळी,श्री.मयुरेश परब,श्री.मारूती मांजरे,श्री.श्रीधर च०हाण असे अनेक कोकणवासिय उपस्थित होते.उपस्थित अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here