विद्यार्थ्यांसाठी ज्ञानोत्सव! जिजाऊ संस्थेच्या वतीने वक्तृत्व आणि क्विझ स्पर्धेचे आयोजन.

0
31

रत्नागिरी – जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र (रत्नागिरी विभाग) यांच्या वतीने सौ. भावनादेवी भगवान सांबरे (आई) यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी व लांजा विभागातील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आणि क्विझ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देण्याचा आणि त्यांच्यातील वक्तृत्व कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि प्रेरणादायी विषयांवर प्रभावी भाषण दिले. तर क्विझ स्पर्धेत सर्वसाधारण ज्ञान, विज्ञान, इतिहास आणि सध्याच्या घडामोडींसंदर्भातील प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी उत्तरे देत आपली बौद्धिक क्षमता सिद्ध केली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, भविष्यातही विद्यार्थ्यांसाठी असे उपक्रम आयोजित करण्यात येतील, असे संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना नवे ज्ञान मिळाले तसेच त्यांचा आत्मविश्वासही वाढला, असे मत शिक्षक व पालकांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here