Saturday, April 19, 2025

Top 5 This Week

Related Posts

शिव धामापूरमधील ग्रामस्थांच्या हाती ‘राष्ट्रवादी’ची ‘तुतारी’; राष्ट्रवादी शरद पवार गटात केला पक्षप्रवेश

⛔ *टाइम्स विश्वनाथ न्यूज*


🔷 *राष्ट्रवादीचे प्रशांत यादव विधानसभेसाठी सज्ज?*

*संगमेश्वर:-* चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील संगमेश्वर तालुक्यातील शिव धामापूर येथील प्रमुख कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षात जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा चिपळूणचे माजी आमदार रमेशभाई कदम आणि राष्ट्रवादीचे नेते तथा वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
       
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार या पक्षाच्या चिपळूणमधील संपर्क कार्यालयात आज दुपारी हा पक्षप्रवेश सोहळा झाला. शिव धामापूरमधील सुरेश सखाराम मोरे (घारेवाडी), रविंद्र रघुनाथ जाधव (राऊळवाडी), अनिल दत्ताराम मोरे (घारेवाडी), तुकाराम सखाराम चव्हाण (घारेवाडी), अनिकेत अनिल मोरे (घारेवाडी) आणि जयेश शिवराम गमरे (बौद्धवाडी) आदींनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी रमेशभाई कदम आणि प्रशांत यादव यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष दत्ताराम लिंगायत, राष्ट्रवादीचे चिपळूण तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष रईस अलवी, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष जनार्दन पवार, चिपळूण शहर उपाध्यक्ष राकेश दाते, दिनेश शिंदे, तुरळचे माजी सरपंच शंकर लिंगायत, निवळीचे माजी उपसरपंच आत्माराम घडशी, राष्ट्रवादी युवकचे तालुका उपाध्यक्ष राहुल पवार, प्रशांत यादव यांचे स्वीय सहायक गुलजार गोलंदाज आदी उपस्थित होते.

*टाइम्स विश्वनाथ न्यूज ला फॉलो करा!*

*WhatsApp:-* https://chat.whatsapp.com/LN7K9KLUQoU4Q0ddYmmUiS

Popular Articles

error: Content is protected !!