संगमेश्वर:- संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीने कडवई बाजारपेठेतून रूट मार्च काढण्यात आला.हा रूट मार्च कडवई ग्रामपंचायत ते कडवई बाजारपेठ असा काढण्यात आला. संगमेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित यादव व पोलीस निरीक्षक राजेश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च काढण्यात आला.
विधानसभा निवडणुक भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी हा रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चमध्ये १०० मुंबई पोलीस जवान,९० होमगार्ड व सेंट्रल सिक्युरिटी फोर्सचे जवान सहभागी होते. यावेळी कडवईचे बीट अंमलदार चंद्रकांत कांबळे, सचिन कामेरकर, वर्षाराणी कोष्टी आदी संगमेश्वर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.