संस्कृत विद्वान प्रो. टी. एन. प्रभाकर यांची रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राला सदिच्छा भेट!

0
37

रत्नागिरी:- कर्नाटकातील म्हैसूर येथील संस्कृत विद्वान प्राध्यापक टी. एन. प्रभाकर यांनी भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्राला सोमवारी सदिच्छा भेट दिली. रत्नागिरी दौऱ्यावर असताना टी.एन. प्रभाकर यांनी रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात येऊन विद्यार्थ्यांची व संस्कृत प्रेमींसोबत संवाद साधला. संस्कृतचे भवितव्य आणि संस्कृतचे महत्त्व या संदर्भात चर्चा केली. त्याचप्रमाणे संस्कृत भाषा हीचे नावीन्य आणि वेगळेपण आपल्या ओघवत्या वाणीतून स्पष्ट केले.यावेळी संस्कृत भारतीच्या कोकण प्रांताच्या अध्यक्षा डॉ कल्पना आठल्ये, रत्नागिरी उपकेंद्रातील प्रा. अविनाश चव्हाण, प्रा कश्मिरा दळी, प्रा. अक्षय माळी आणि कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थी व संस्कृत भाषा प्रेमी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here