⛔ *टाईम्स विश्वनाथ न्यूज*
🔷 *’राष्ट्रपती पुरस्कार’ प्राप्त शिक्षिका शोभा नाखरे यांनी साधला पालकांशी संवाद!*
*सावर्डे (चिपळूण):-* श्री. विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या इंग्लिश मिडीयम स्कुल आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, सावर्डे च्या वतीने “सुजाण पालकत्त्व” हा कार्यक्रम पालकांशी सुसंवाद साधण्यासाठी आज आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाकरिता मुख्य वक्त्या म्हणून माजी मुख्याध्यापिका शोभा नाखरे यांनी पालकांना मार्गदर्शन केले. शोभा नाखरे या ‘राष्ट्रपती पुरस्कार’ व ‘कर्तृत्ववान महिला महापौर पुरस्कार’ या दोन महत्त्वाचे मानले जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानित नावाजलेल्या शिक्षिका आहेत.
व्याख्यानात व्याख्यानकारांनी पालकांनी विद्यार्थ्यांबरोबर कसे वागावे व आई-वडिलांनी मुलांवर कोणत्या पद्धतीने संस्कार करावे व कोणत्या पद्धतीने वर्तणूक करावी, याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमावेळी शाळा संचालक श्रीमती शरयू यशवंतराव मॅडम, माध्यमिकच्या प्राचार्य श्रीमती प्रज्ञा पारकर मॅडम, पूर्व प्राथमिकच्या प्राचार्या श्रीमती तेंडुलकर मॅडम, इत्यादी शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. व्याख्यानाचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
*’टाईम्स विश्वनाथ न्यूज’ ग्रुप फॉलो करा!*
https://chat.whatsapp.com/KVP3IHwRYzk4gpd54kBVVk
सावर्डे येथे “सुजाण पालकत्त्व” या विषयावरील व्याख्यान संपन्न!
