रत्नागिरी, दि. 08 फेब्रुवारी 2025 – ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या रत्नागिरी तालुका शाखेची मासिक सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ही सभा कुवारबाव, रत्नागिरी येथे कार्याध्यक्ष निलेश लाड यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. तालुकाध्यक्ष चंद्रकांत रामचंद्र भुवड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत सामाजिक समस्या सोडवण्याच्या आणि पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
संघटनेने सामाजिक न्यायासाठी घेतलेला वसा कायम ठेवत निपक्षपणे काम करण्याचा निर्धार केला आहे. पीडितांच्या अडीअडचणी सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध रणनीती आखण्यात आल्या. गेल्या अनेक वर्षांपासून ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ही संघटना सामाजिक कार्य करत असून अनेक पीडित व्यक्तींना न्याय मिळवून देण्यात यशस्वी ठरली आहे.
तालुका पातळीवरील या बैठकीला प्रमुख पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये तालुका उपाध्यक्ष हरेश गुरव व जीया अहमद मुल्ला, कार्याध्यक्ष निलेश लाड, सचिव विनायक गावडे, सहसचिव अखळाक काद्री, खजिनदार सुनिल सनगरे, निरीक्षक श्री. कांबळे, संघटक संजय (शिवा) पाटणकर तसेच सुनील नलावडे, श्री. घाणेकर, अभिजित पंडित आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या मासिक सभेदरम्यान संघटनेच्या आगामी कार्यपद्धतीवर चर्चा झाली तसेच सामाजिक अन्यायाविरोधात अधिक प्रभावी भूमिका बजावण्याचा संकल्प करण्यात आला.