♦ सरपंचांसह कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश.
आगवे, लांजा:- तालुक्यातील आगवे गावात शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का बसला असून, सरपंच प्रफुल्ल कांबळे यांच्यासह जोशी गावातील अनेक कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
हा पक्षप्रवेश कार्यक्रम आगवे येथे नुकताच पार पडला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, लांजा तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, भटके विमुक्त जिल्हा उपाध्यक्ष अनंतजी खरात, जिल्हा कमिटी सदस्य वाघोजी खानविलकर, कोटचे उपसरपंच रवींद्र नारकर, तालुका उपाध्यक्ष अनंत चौगुले, आणि आगवे गावचे बुथ अध्यक्ष श्रेयस मुळ्ये यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश करण्यात आला.
या वेळी सरपंच प्रफुल्ल कांबळे यांच्यासह नितीन मोरे, राजेंद्र मोरे, बाबल्या बेंद्रे, रामदास जोशी, सुरेश मोरे, नारायण जोशी, विष्णू जोशी, रवींद्र जोशी, संदीप जोशी, बापू जोशी, संतोष जोशी, तन्मय पवार, किशोर जोशी, प्रकाश जोशी, काशिनाथ मोडक, हिरु जोशी, बाळकृष्ण मोरे, सुहानी जोशी, जयश्री जोशी, राजश्री जोशी, प्रिती जोशी, धनाजी जोशी, संकेत जोशी, दत्ताराम जोशी, प्रथमेश मोरे, सुजल जोशी, अजय जोशी, अनंत कोलगे, दिनेश जोशी, नरेश जोशी, अशोक जोशी, साहिल नेवरेकर, शुभम जोशी, संजय जोशी, बापू नेवरेकर, शांताराम मोरे, आणि सुरेश मोरे यांचा भाजपात समावेश झाला.
सर्व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्याबद्दल जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी त्यांचे शाल घालून स्वागत केले. यावेळी तालुका सरचिटणीस शैलेश खामकर, शक्ती केंद्रप्रमुख प्रथमेश बेंडल, संकेत कदम, आणि अनंत खरात आदी मान्यवर उपस्थित होते.
गावातील कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश करताना सांगितले की, भाजपाचे विकासाचे धोरण आणि त्यांच्या नेतृत्वामुळे हा निर्णय घेतला आहे. आता आगवे गाव आणि जोशी गावातील कार्यकर्ते व ग्रामस्थ भाजपाच्या माध्यमातून गावाचा विकास साधतील.