लांजा:- लांजा तालुक्यातील विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि मान्यवरांनी आज आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश केला. राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त हा प्रवेश त्यांच्या नेतृत्वाला दिलेले गिफ्ट असल्याचे नवप्रवेशितांनी सांगितले.
शिवसेनेत सामील झालेले मान्यवर
RDCC संचालक: मुन्ना खामकर
काँग्रेस माजी शहराध्यक्ष: प्रसन्न शेट्ये
उबठा महिला शहर संघटीका: छायाताई गांगण
वि.का.स. सोसायटीचे उपाध्यक्ष: विकास चव्हाण
राष्ट्रवादी शहर अध्यक्ष: शरीफ नाईक
पंकज लांजेकर, बावा राणे, आरवाग उपसरपंच स्वानंद कदम आणि इतर मान्यवर
कार्यक्रमाला उपस्थित नेतेमंडळी
विधानसभेचे प्रमुख राजू कुरूप, तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, मनोहर बाईत, शहर प्रमुख सचिन डोंगरकर आणि अन्य शिवसेना पदाधिकारी या महत्त्वपूर्ण क्षणी उपस्थित होते.
सामाजिक आणि राजकीय हालचालींमुळे शिवसेनेची ताकद लांजा तालुक्यात वाढताना दिसत आहे.