India Post Payments Bank (IPPB) या संस्थेला वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाकडून (DFS) “Digital Payments Award 2024-25” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
IPPB ही भारत सरकारची 100% मालकीची बँक असून, ती डाक विभागाच्या अंतर्गत कार्यरत आहे. 1 सप्टेंबर 2018 रोजी IPPB ची स्थापना झाली. या बँकेचा उद्देश आहे – सर्वसामान्यांसाठी सुलभ, विश्वासार्ह व परवडणारी बँकिंग सेवा देणे.
IPPB ही लहान स्वरूपाची पेमेंट बँक असून, ती कर्ज किंवा क्रेडिट कार्ड देत नाही. मात्र ती ठेवी स्वीकारणे, रेमिटन्स सेवा, मोबाइल व्यवहार, नेट बँकिंग, UPI, QR कार्ड, आधार आधारित खातं उघडणे आणि जैवमाध्यमांद्वारे व्यवहार यांसारख्या सेवा देते. ही बँक देशातील 1.65 लाख टपाल कार्यालयांच्या नेटवर्कद्वारे शेवटच्या टप्प्यापर्यंत बँकिंग पोचवते.