एसटीचे भाडे १५ टक्के वाढले, रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात ३ रुपये वाढ.

0
29

मुंबई:- महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना आणखी एक धक्का, राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) बस आणि रिक्षा-टॅक्सी भाड्यात वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून एसटीच्या तिकीट दरात १५ टक्के वाढ करण्यात आली आहे, तर रिक्षा व टॅक्सीच्या किमान भाड्यात प्रत्येकी ३ रुपये वाढ होणार आहे. १ फेब्रुवारीपासून नवीन दर लागू होतील.

महायुती सरकारने गतवर्षी विधानसभा निवडणुकीच्या वेळी सवलती दिल्या होत्या, परंतु नवे सरकार स्थापन होताच नागरिकांना दरवाढीचा सामना करावा लागला आहे. एसटीच्या भाडेदरात १४.९५ टक्के वाढ करण्यास मान्यता दिली होती. रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यांत वाढ १ फेब्रुवारीपासून लागू होईल.

गेल्या काही वर्षांत पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरांमध्ये झालेल्या वाढीमुळे आणि इतर आर्थिक घटकांचा विचार करून ही दरवाढ लागू केली आहे. दरवाढीनंतर रिक्षा आणि टॅक्सीच्या मीटरची ‘रिकॅलिब्रेशन’ सुधारणा ३० एप्रिलपर्यंत केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here