लांजा:- कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित, लांजा शाखा, रत्नागिरीचा चौथा वर्धापन दिन रविवार, दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष मा. विलास दरडे, संचालक गणेश जोशी, ॲड. महेंद्र मांडवकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप डाफळे, स्थानिक कमिटी सदस्य श्रीकांत मांडवकर यांसह सभासद आणि ठेवीदार दिलीपकुमार शिंगाडे, संतोष आंबेकर, मुकेश माने, मंदार नैकर, दीपक सावंत, सागर कलंबटे, बावीसकर, विश्वास मांडवकर, कु. शिवानी चोरगे, शाखाधिकारी जयवंत खुलम, आणि संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.