रत्नागिरी:- कोंकण कोस्टल मॅरेथॉन 5 किलोमीटर स्पर्धेत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र विभाग रत्नागिरीतील पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण घेत असलेल्या आराध्या अमोल धुळप हिने तिसरा क्रमांकाचा मान मिळवला.
आराध्याने आपल्या अथक परिश्रमांद्वारे या स्पर्धेत आपली कसरत सिद्ध केली आणि तिसऱ्या स्थानावर येऊन संस्थेचे नाव उज्जवल केले.
जिजाऊ संस्थेच्या वतीने आराध्याला हार्दिक अभिनंदन आणि तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.