रत्नागिरी:- रविवारी, ५ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या कोकण कोस्टल मॅरेथॉन २१ किलोमीटर स्पर्धेत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे पोलीस भरती प्रशिक्षक सौरभ रावणंग यांनी तिसरा क्रमांक मिळवून मान राखला.
रत्नागिरी तालुक्यातील निवळी गावचे सौरभ रावणंग यांनी उत्कृष्ट धावणं सादर करून, आपल्या धैर्य आणि मेहनतीने तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले.
जिजाऊ संस्थेच्या वतीने त्यांना हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.