📍 झरेवाडी: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा झरेवाडी येथे “कोकण पर्यावरण, पर्यटन आणि भविष्य” या विषयावर धीरज वाटेकर यांचे आणि “साप – समज व गैरसमज” या विषयावर अनिकेत चोपडे यांचे व्याख्यान संपन्न झाले.
विद्यार्थ्यांनी संपूर्ण व्याख्यानाचा अभ्यासपूर्ण आनंद घेतला. दोन्ही वक्त्यांनी सहज, सोप्या आणि ओघवत्या शैलीत पीपीटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला केंद्रप्रमुख विष्णू पवार, शाळेच्या अपग्रेड मुख्याध्यापिका आशा बगाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ओंकार आचरेकर, उपाध्यक्ष विश्वनाथ कळंबटे, उपशिक्षक संतोष पेवेकर, उपशिक्षिका सरिता आलिम, पदवीधर शिक्षिका संजीवनी यादव, उपशिक्षिका अपूर्वा काळोखे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक राजेश गोसावी यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपशिक्षक रामनाथ बने यांनी केले.