रत्नागिरी: तालुक्यातील श्रीदेव गणपतीपुळे संस्थानतर्फे माघी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव ३० जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसह पार पडणार आहे.
गुरुवार, ३० जानेवारी रोजी सकाळी ९:३० वाजता ‘श्रीं’ची महापूजा, तर सायंकाळी ४ वाजता गणेशयागाचे आयोजन करण्यात आले आहे. दैनंदिन कार्यक्रमांत दररोज सायंकाळी ७ वाजता सामुदायिक आरती व मंत्रपुष्प होणार आहे.
मुख्य कार्यक्रम:
- ३१ जानेवारी: सकाळी ७ वाजता गणेशयाग पूर्णाहूती
- १ फेब्रुवारी: सायंकाळी ४ वाजता ‘श्रीं’ची पालखी मिरवणूक
- २ फेब्रुवारी: सहस्त्र मोदक समर्पण सोहळा
- ३ फेब्रुवारी: सायंकाळी ७:३० वाजता ‘स्वरसंध्या’ गायन कार्यक्रम, गायक कुणाल भिडे व वैष्णवी जोशी यांचे सादरीकरण
- ४ फेब्रुवारी: रात्री १० वाजता ‘मोरूची मावशी’ नाटकाचे सादरीकरण
उत्सवाच्या निमित्ताने दररोज सायंकाळी ७:३० वाजता कीर्तनमाला आयोजित करण्यात आली असून, ह. भ. प. मोहनबुवा कुबेर (नागपूर) यांचे कीर्तन सादर होणार आहे.
यासंदर्भात श्रीदेव गणपतीपुळे संस्थानने जय्यत तयारी केली असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. श्रीराम केळकर यांनी केले आहे.