देवरूख:- देवरूख कॉलेज रोड ते श्री गणेश नारकर परिसरातील रहिवाशांना गेल्या दीड वर्षांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, अनेकांना पाणीच मिळत नसल्याची समस्या निर्माण झाली आहे. स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे.