Thursday, April 17, 2025

Top 5 This Week

Related Posts

धक्कादायक! गुहागरात शाळकरी मुले चक्क बिबट्याच्या पिल्लाला खेळवत असल्याचा प्रकार समोर!

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथील उमरट जिल्हा परिषद शाळेत चक्क शाळेची पोरं बिबट्याच्या पिल्लाला खेळवत असल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथील उमरट जिल्हा परिषद शाळेत चक्क शाळेची पोरं बिबट्याच्या पिल्लाला खेळवत असल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. उमरट येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलं बिबट्यांच्या पिल्लाला उचलून घेऊन शिक्षकांच्या समोरच खेळवत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. परंतु येथे आजूबाजूला जर एखादा बिबट्या असेल तर त्या पिल्लासहित त्या मुलाच्याही जीवाला धोका पोहोचण्याची शक्यता होती.

हा सगळा प्रकार त्यांच्या शिक्षकांच्या पुढ्यात होत असतानासुद्धा चक्क बिबट्याचे पिल्लू शाळेत वावरत असल्याचा प्रकार जिल्ह्यात पहिल्यादाच घडला आहे. मात्र अशावेळी शिक्षक बघ्याची भूमिका घेत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. बिबट्याचे पिल्लू नाचवीने आणि त्याच्या बरोबर खेळणे सर्वच विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ केल्यासारखे होते. मात्र शिक्षकांनाही या विषयाचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते. दरम्यान वनविभाग तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभाग हा प्रकार किती गांभीर्याने घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यासर्व प्रकारामुळे गुहागर गाव परिसरात बिबट्यांचा वावर असल्याचे लक्षात येत आहे. यावर वेळीच वन विभागाने लक्ष घालून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरु लागली आहे.

Popular Articles

error: Content is protected !!