चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात गाडी अडवून मारहाण केली होती, याबाबत फिर्यादीने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी अटक होण्याची शक्यता असल्याने आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने त्यावर विचार करून फहद खान, फैजल खान आणि महमद खान यांना अटी आणि शर्तींवर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तसेच पोलिसांसमोर तपासासाठी हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
या प्रकरणाची सुनावणी लवकरच होणार आहे. यापूर्वी या तिघांवर परशुराम घाटात मारहाण केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी या तिघांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला, आणि त्यावर आज सुनावणी झाली. यानंतर कोर्टाने तिघांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.
फहद खान, फैजल मेमन आणि महमद खान यांच्या वतीने ॲड. आदित्य शर्मा, शैलेश चव्हाण, आणि कौन्सिलर कुलदीप पाटील यांनी युक्तिवाद केला. न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांनी हा निर्णय दिला. आतापर्यंत गुन्हा दाखल झालेल्या पाचजणांना पुराव्यांच्या अभावी अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. आता या प्रकरणाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष आहे.