विश्व:- पाकिस्तानचे १६ अणुशास्त्रज्ञ, ज्यामध्ये ऊर्जा आयोगाच्या इंजिनिअरचाही समावेश आहे, यांना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ने पळवून नेले आहे. तालिबानने अपहरण केलेल्या शास्त्रज्ञांचा व्हिडीओ जारी करत, त्यांच्या अटी सरकारने मान्य करून शास्त्रज्ञांना सोडवावे, अशी मागणी केली आहे. यासोबतच, पाकिस्तानच्या युरेनियमच्या खाणीमधून मोठ्या प्रमाणात युरेनियमची लूटही करण्यात आली आहे. या घटनेने पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. TTP ने शास्त्रज्ञांना इजा पोहोचवण्याचा हेतू नसल्याचे सांगितले असून, त्यांच्या अटी मान्य करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.