देवरुख:- देवरुख येथील जि. प. शाळा देवरुख नंबर 2 या शाळेला शाळा सुधार समिती चे सरचिटणीस श्री. रविकांत कदम व शाळेचे माजी विद्यार्थी, बँक ऑफ इंडियाचे अधिकारी श्री. विनोद कदम यांच्या प्रयत्नांनी बँक ऑफ इंडिया या बँकेकडून आज संगणक संच प्राप्त झाला. याप्रसंगी बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर श्री नरेंद्र देवरे , देवरुख शाखेचे मॅनेजर श्री रामचंद्र जाधव, बँकेचे अधिकारी श्री विनोद कदम, शाळा सुधार समितीचे अध्यक्ष श्री बापू गांधी ,उपाध्यक्ष श्री अभिजीत शेट्ये , सरचिटणीस श्री रविकांत कदम ,सदस्य श्री अभिजीत चव्हाण उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ स्नेहल यशवंतराव यांनी शाळेची गरज ओळखून शाळेला मदत केल्याबद्दल बँक ऑफ इंडियाच्या टीमचे शाळेच्या वतीने विशेष आभार मानले. उपस्थित मान्यवरां मधील श्री अभिजीत शेट्ये यांचा 20 सप्टेंबर रोजी वाढदिवस असल्याने शाळेच्या मुख्याध्यापिका सौ यशवंतराव ,बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर श्री नरेंद्र देवरे तसेच श्री बापू गांधी, श्री रविकांत कदम श्री अभिजीत चव्हाण व शाळेतील सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी यांच्या वतीने श्री अभिजीत शेट्ये यांना शुभेच्छा देण्यात आल्या.