भारतात तयार होणारी e-SUV जी 100+ देशांमध्ये होणार निर्यात; महिंद्रा किंवा टाटा नाही!

0
40

नवी दिल्ली: मारुती सुझुकीने आपली पहिली बॅटरी इलेक्ट्रिक वाहन (BEV) e विटारा सादर केली आहे. हे मॉडेल सुझुकी मोटर कॉर्पोरेशनसाठी जागतिक महत्त्वाचे ठरले आहे.

e विटारा मारुतीच्या गुजरात प्लांटमध्ये तयार होणार असून 100 हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जाणार आहे, ज्यामध्ये जपान व युरोपातील देशांचाही समावेश आहे.

जपानला निर्यात होणारी ही मारुतीची दुसरी SUV आहे. यापूर्वी फ्रॉन्क्स SUV जपानला पाठवण्यात आली होती. तसेच, बलेनो व फ्रॉन्क्स नंतर हा तिसरा मॉडेल असेल.

गुजरात प्लांटमध्ये EV साठी चौथी प्रोडक्शन लाईन उभारण्यात आली आहे. या चौथ्या लाईनमुळे मारुती एक वर्षात भारतातील नंबर वन EV उत्पादक होण्याचा निर्धार केला आहे.

e विटारा Heartect-e या नवीन BEV प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. यामध्ये 49kWh आणि 61kWh असे दोन बॅटरी पर्याय देण्यात आले असून एका फुल चार्जमध्ये 500 किमीपेक्षा अधिक रेंज देण्याचा दावा करण्यात आला आहे.

SUV मध्ये एलईडी हेडलॅम्प्स, 18-इंच अ‍ॅरोडायनामिक अलॉय व्हील्स, 10.1-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंच MID, 7 एअरबॅग्स, लेव्हल 2 ADAS, स्लायडिंग व रीक्लाइनिंग रियर सीट्स, व Suzuki Connectसह 60 हून अधिक फिचर्सचा समावेश आहे.

(e-vitara price) भारतातील अंदाजे किंमत 18 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होणार आहे. e विटारा ही Hyundai Creta Electric, Mahindra BE 6, Tata Curvv.ev आणि MG ZS EV यांसारख्या वाहनांना टक्कर देईल.

————————————————————————————————————————————–

royal enfield scram 440
tata sierra
suzuki gixxer sf 250 flex fuel
tvs jupiter cng scooter
e vitara price
byd sealion 7
2025 kawasaki ninja 500
mg cyberster
creta ev price
hero xoom 160
eva solar car
vinfast
jonny bairstow
byd
tesla share price
tesla
pasighat
yamaha fz hybrid
xuv 700

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here