लांजा:- आगवे बौद्धीय मंडळ मुंबई ग्रामीण (रजि.), आम्रपाली महिला मंडळ, जागृती मित्र मंडळ आणि लोकमान्य शिक्षण संस्था संचलित कै. रा. सि. बेर्डे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सापुचे तळे, लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने “माझे संविधान, माझा अभिमान” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन 26 जानेवारी 2025 रोजी सापुचेतळे येथील बेर्डे हायस्कूल हॉल येथे करण्यात आले. भारतीय प्रजासत्ताकाच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधानाविषयी जागृती निर्माण करण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे होता.
विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी अभिमान आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी श्री. राहुल गीरी (युवा व्याख्याते व अभ्यासक, बीड) यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रम श्री. केशव कांबळे आणि श्री. अनंत कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. तसेच श्री. चंद्रकांत कांबळे (मार्गदर्शक), मुख्याध्यापक अनिल गुरव, लोकमान्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र लोटणकर आणि संचालक मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अविनाश कांबळे, चंद्रसेन कांबळे, गणपत कांबळे यांचे महत्त्वाचे योगदान लाभले. सूत्रसंचालन रवींद्र कांबळे आणि अमोल कांबळे यांनी केले. तसेच सरपंच प्रफुल कांबळे, सिद्धार्थ कांबळे, रमेश कांबळे, नारायण कांबळे, योगेश कांबळे, संदेश कांबळे, दशरथ कदम, सुधीर कांबळे आणि नरेश जाधव यांनी विशेष परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी अभिमान जागृत झाला असून, उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.