📍 मुंबई: महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन २०२५ मध्ये मंथन आर्ट स्कूलच्या इरोशा वास आणि साईराज कोठावळे यांच्या कलाकृतींना राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच, ९ विद्यार्थ्यांच्या पोस्टर कलाकृतींची राज्य कला प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
राज्य कला प्रदर्शनात मंथन आर्ट स्कूलचा चमकदार सहभाग
कलासंचालनालय, मुंबईच्या वतीने आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. प्रसाद गवळी, आकांक्षा कदम, मकरंद राणे, राहुल कवणेकर, श्रावणी पारकर, सृष्टी राजपूत, करण भातडे, विवेक पाटील आणि दिव्यांक तांबे यांच्या सामाजिक जनजागृतीपर पोस्टरची निवड झाली आहे.
४ ते १० फेब्रुवारीदरम्यान प्रदर्शन
हे राज्य कला प्रदर्शन मुंबईतील प्रसिद्ध जहांगिर कलादालनात ४ ते १० फेब्रुवारी २०२५ दरम्यान आयोजित केले जाणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे प्रा. शशिकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कार्य घडून आले आहे. विद्यार्थ्यांचे पालक आणि संस्थेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.